Soumitra Athavale Scientists : जगातील १२ प्रज्ञावंत शास्त्रज्ञांत पुण्यातील डॉ. सौमित्र आठवले यांची निवड

Dr Soumitra Athavale Pune Scientist World's Top 12 Scientists
Published on
Updated on

पुणे : पुण्याचे युवा वैज्ञानिक डॉ. सौमित्र आठवले यांची अमेरिकन केमकिल सोसायटी च्या संशोधन पत्रिकेने जाहिर केलेल्या जागतिक पातळीवरील प्रतिष्ठीत 'टॅलेंट १२' या मानाच्या यादीत निवड झाली आहे.

'टॅलेंट १२' हा उपक्रम रसायनशास्त्र शाखेत संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी घेतला जातो. यंदा जगातून सुमारे ५४० नामांकने आली होती.त्यातून फक्त १२ वैज्ञानिकांची निवड झाली.यात पुण्यातील डॉ.सौमित्र आठवले यांचा समावेश आहे.त्यांच्या संशोधनाची माहिती केमिकल अँड इंजिनिअरिंग न्यूजच्या विशेषांकात नुकतीच प्रसिध्द झाली आहे.डॉ.आठवले हे पुण्यातील आयसर (राष्ट्रीय विज्ञान संस्था) चे विद्यार्थी असून सध्या कॅलिफोर्निया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करतात.त्यांचे शालेय शिक्षण अभिनव शाळेत झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news