Pune DJ Loudspeaker Noise Protest
पुणे: विद्यानंद बापट यांना समर्थन देण्यासाठी आणि डीजेच्या बंदीसाठी पुणेकरांनी आज (दि. ६) बालगंधर्व रंगमंदिर ते पुणे महानगरपालिका असा मोर्चा काढला. डीजेविरोधी आणि ध्वनीप्रदूषणविरोधी मोर्च्यात तरुणांसह सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक संस्था उतरल्या होत्या.
तत्पूर्वी, पुणे पोलिसांनी गणेशोत्सवात डीजे आणि साऊंड सिस्टीमच्या वापराला विरोध दर्शवणारे विद्यानंद बापट यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. सुरक्षेची गंभीर दखल घेत बापट यांनी या मोर्चात प्रत्यक्ष सहभागी न होण्याचा निर्णय घेतला.