

पुणे : शहर,पिपंरी चिंचवडसह जिल्ह्यात सोमवारच्या तुलनेत मंगळवारी मुसळधार पावसाचा जोर दुपारी 4 नंतर कमी झालेला दिसून आला.मात्र बुधवारी देखील जिल्ह्यात मध्यम पावसाचा अंदाज आहे. मंगळवारी माळीन भागात सर्वाधिक 37.5 मी.मी ची नोंद झाली.
सोमवार पर्यंत जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार निर्माण केला होता. बारामती, दौड तालुक्यांसह बहुतांश भागात पाणीच पाणी झाले होते. पाऊस गेले दहा दिवस सातत्याने पडत होता. प्रामुख्याने गेल्या 72 तासांत त्याने रौद्ररुप दाखवत दादाणादाण उडवून दिली होती. मात्र मंगळवारी 27 मे रोजी दुपार नंतर पावसाचा जोर सर्वच भागात कमी झाल्याचे दिसून आले.
माळीन 37.5, वडगावशेरी 33.5, तळेगाव ढमढेरे 27.5, चिंचवड 27.5, एनडीए 24.5, डुडुळगाव 24, मगरपट्टा 18, पाषाण 17.1, हवेली 16.5, हडपसर 16, शिवाजीनगर 15.7, लवासा 15.5, तळेगाव 14.5, गिरीवन 13.5, राजगुरुनगर 12, दौंड 9.5, कुरवंडे 9, कोरेगावपार्क3, नारायणगाव 2, भोर 1, पुरंदर 0.5, बारामती 0.4