विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्व 21 मतदारसंघांत दाखल करण्यात आलेल्या 757 अर्जांची बुधवारी छाननी करण्यात आली. यात 648 अर्ज वैध, तर 109 अर्ज फेटाळण्यात आले आहेत. जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांतून 551 उमेदवारांनी 757 अर्ज जिल्हा निवडणूक शाखेकडे दाखल केले होते. बुधवारी या सर्व अर्जांची छाननी झाली. यात 109 अर्ज फेटाळण्यात आले आहेत.
येत्या 4 नोव्हेंबर रोजी 3 वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. यानंतर जिल्ह्यातील निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. 21 मतदारसंघांतील 1 हजार 272 उमेदवारांनी 2 हजार 506 अर्ज खरेदी केले आहेत. त्यांपैकी प्रत्यक्षात दाखल केलेल्या अर्जांची संख्या खूपच कमी आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.