

पुणे : तांत्रिक समस्येमुळे पुण्याहून दिल्लीला जाणारे विमान पुन्हा पुणे विमानतळावर उतरवण्यात आल्याची प्राथमिक माहिती माहिती समोर येते आहे. दिल्लीला न जाता हवेतच काही वेळ उड्डाण केल्यानंतर पुन्हा हे विमान पुणे विमानतळावर उतरवण्याची पायलटने परवानगी मागितली, परवानगी मिळताच पुन्हा विमान पुणे विमानतळावर उतरवण्यात आले.(Latest Pune News)
प्रवाशांनी या घटनेला इमर्जन्सी लँडिंग झाल्याची सांगितले. मात्र विमानतळ प्रशासनाने कोणतीही इमर्जन्सी लँडिंग नसल्याचे सांगत मेडे कॉल आला नाही, असेही स्पष्ट केले.
याबाबत पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके म्हणाले, सकाळी नेहमीप्रमाणे पुणे विमानतळाहून दिल्लीला जाण्यासाठी स्पाइस जेटच्या विमानाने उड्डाण केले. काही वेळानंतर पायलटला विमानामध्ये तांत्रिक अडचण असल्याचे जाणवले. त्यामुळे पायलटने पुन्हा विमान पुणे विमानतळावर उतरवले. कोणतीही इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली नाही, किंवा एटीसीला कोणताही मेडे कॉल आला नाही. मात्र तांत्रिक कारणामुळे पायलेटने विमान पुन्हा पुणे विमानतळावर उतरवले.