Pune Chain Snatching | दुचाकीला कट मारून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लांबविले; सीसीटीव्हीत घटना कैद

दौंड तालुक्यातील पांढरेवाडीतील घटना; २ लाख ८५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी हिसकावला
Daund Gold Chain Snatching
Daund Gold Chain Snatching Pudhari
Published on
Updated on

Daund Gold Chain Snatching

कुरकुंभ : दुचाकीवरून घरी जाणाऱ्या महिलेच्या दुचाकीला कट मारून दोन अज्ञात चोरट्यांनी तिच्या गळ्यातील २ लाख ८५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून नेल्याची घटना दौंड तालुक्यातील कुरकुंभ-पांढरेवाडी हद्दीत घडली. गुरुवारी (दि. १०) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत हर्षदा श्रीकांत जाधव (वय ३६, रा. पांढरेवाडी, मुकादमवाडी, ता. दौंड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षदा जाधव आणि अन्य एक महिला कुरकुंभ येथील काम आटोपून पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्याने दुचाकीवरून मुकादमवाडी, पांढरेवाडीकडे जात होत्या. यावेळी रस्त्याच्या कडेला दोन अज्ञात चोरटे दुचाकीवर उभे होते.

Daund Gold Chain Snatching
Pune Crime News: पुण्यात खाकीवरच कोयत्याचा वार! गांजा पिणाऱ्या टोळक्याने ड्युटीवर असणाऱ्या पोलिसाचा गळा चिरला; परिसरात खळबळ

महिलांची दुचाकी पुढे जाताच चोरट्यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. काही अंतर गेल्यानंतर रस्त्यावर मागे-पुढे किंवा आजूबाजूला कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीला कट मारला. त्यामुळे महिला दुचाकीवरील तोल सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या मिनी गंठणाला जबरदस्तीने हिसका मारून ते लंपास केले.

गंठण हिसकावून घेतल्यानंतर दोन्ही चोरटे दुचाकीवरून पसार झाले. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये या अज्ञात चोरट्यांचे चित्रीकरण कैद झाले असून, त्याच्या आधारे पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news