पुणे : गेली दहा दिवस बुकींग केलेली वाहने घरी नेण्यासाठी दसऱ्याच्या मुहूर्तावर आणि पूर्वसंध्येला पुणेकरांनी वाहन विक्रीच्या दालनांत मोठी गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले, बहुतांश पुणेकरांनी पूर्वसंध्येलाच आपल्या कुटुंबीय, मित्रपरिवारांसह वाहन विक्रीच्या दालनांमध्ये येत, बुक केलेल्या वाहनाची मनोभावे पूजा केली अन् नव्या वाहनांना घरी नेले.
घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत अनेक पुणेकरांनी वाहनांच्या खरेदीचे अगोदरच बुकींग करून ठेवले होते. गेल्या दहा दिवसांमध्ये पुणेकरांनी तब्बल साडेनऊ हजार नवीन वाहनांची खरेदी केल्याची नोंद पुणे आरटीओने केली आहे. त्यानुसार या वाहनांची नोंदणी देखील पूर्ण होत आहे, अनेकांनी दसऱ्याच्या पूर्वसंध्येलाच बुक केलेली वाहने घरी नेली, तर काहींनी दसऱ्याच्या मुहूर्तावर आज गुरुवारी (दि. 02) वाहने घरी नेण्याची तयारी केली आहे.
यश, किर्ती, आनंद अन् समृद्धीसाठी प्रार्थना
याशिवाय घराघरांमध्ये पंचपक्वानांचा बेतही आखला जाणार आहे. सायंकाळच्या वेळेस लहान मुले मोठ्यांना आपट्याची पाने (सोनं) देऊन त्यांचा आशीर्वाद घेणार आहेत. दसऱ्याला सीमोल्लंघन, शमीपूजन, सरस्वती पूजन आणि शस्त्रपूजन केले जाणार आहे. काहींनी वाहन, सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी आगाऊ बुकिंग केले असून, त्या वस्तू शुभ मुहूर्तावर घरी आणल्या जाणार आहेत. एकूणच दसऱ्याच्या निमित्ताने सहकुटुंब एकत्र येऊन हा सण साजरा करणार असून, घरात धनसंपन्नता, यश, किर्ती, एकोपा, चैतन्य आणि आनंद नांदावा यासाठी प्रार्थना केली जाणार आहे.
घरातील वस्तूंची विधिवत पूजा
दसऱ्याच्या निमित्ताने घराघरांमध्ये, कार्यालयांमध्ये आणि संस्थांमध्ये वस्तूंंची पूजा करण्यात येणार आहे. घराच्या दाराला झेंडूच्या फुलांचे आणि आंब्याच्या पानांचे तोरण उभारले जाणार आहे. तसेच, घरातील आणि कार्यालयातील मौल्यवान वस्तू आणि वाहनांचे विधिवत पूजन करण्यात येणार आहे. त्यांना झेंडूची फुले वाहण्यात येणार आहेत. या वेळी विद्येची देवता असलेल्या सरस्वतीदेवीचे पूजनही करण्यात येईल. लहान मुलांच्या अभ्यासाच्या वही-पुस्तकांचे पूजनही होईल.