Pune News: सायकल मॅरेथॉनदरम्यान वकीलाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

सायकल मॅरेथॉन दरम्यान एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या एका सायकलपटूचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला.
cycle marathon
cycle marathonfile photo
Published on
Updated on

Pune News

पुणे: सायकल मॅरेथॉन दरम्यान आज पहाटे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या एका सायकलपटूचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. बालेवाडी येथील जुपिटर रुग्णालयाजवळ ही घटना घडली. पंजाब इंगळे असे मृत्यू झालेल्या सायकलपटूचे नाव असून, ते पेशाने वकील होते.

cycle marathon
Jalna Accident | धक्कादायक! वाळू माफियांच्या हायवाखाली चिरडून तरुण शेतमजुराचा अंत; भोकरदनमध्ये तणाव

आज पहाटे पुण्यातील बालेवाडी परिसरात सायकल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. इतर सायकलपटूंप्रमाणेच पंजाब इंगळे हे देखील मोठ्या उत्साहाने यात सहभागी झाले होते. मात्र, सायकल चालवत असताना जुपिटर रुग्णालयाजवळ अचानक त्यांच्या छातीत तीव्र कळ आली आणि ते कोसळले.

त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे क्रीडा क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

फिटनेस असूनही हृदयविकाराचा झटका का येतो?

नियमित व्यायाम, धावणे किंवा जिम वर्कआउट करणार्‍यांनाही अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. गेल्या काही महिन्यांत राज्यात फिटनेसप्रेमींचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. आनुवंशिक घटक, कोलेस्टेरॉल वाढ, उच्च रक्तदाब किंवा हार्मोन्समध्ये बिघाड ही हृदयविकाराची छुपी कारणे असू शकतात, याकडे डॉक्टरांनी लक्ष वेधले आहे.

फिटनेस किंवा सडपातळ शरीर याचा अर्थ नेहमीच हृदय पूर्णपणे निरोगी आहे असा होत नाही. अत्याधिक व्यायाम, निर्जलीकरण, चुकीचा आहार किंवा ताणतणावामुळेही अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. नियमित आरोग्य तपासणी, ईसीजी, 2डी-ईको, लिपिड प्रोफाइल यांसारखी चाचणी करणे आवश्यक आहे. व्यायाम सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे, हळूहळू व्यायामाची पातळी वाढवणे, तसेच थकवा, छातीत दुखणे किंवा धडधड वाढल्यास तत्काळ व्यायाम थांबवून वैद्यकीय मदत घेणे गरजेचे आहे, असा सल्ला रूबी हॉल क्लिनिकचे इंटरव्हेन्शनल कार्डियोलॉजिस्ट डॉ. हर्षल इंगळे यांनी दिला आहे.

cycle marathon
Jalna News : पिकअप, दुचाकीची समोरासमोर धडक; दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news