

पौड/पिरंगुट : मुळशी तालुक्यातील पौड येथील परमार बंगल्याशेजारी दारवली गावच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सागर भाऊराव मेश्राम (वय ३२, रा. गंगापुरी, वाई, जि. सातारा) या तरुणाचा मृतदेह आज (दि. २४) रोजी सकाळी दिसला आहे.
हा मृतदेह ज्या बंगल्या शेजारी आढळला आहे तो बांधकाम व्यावसायिक विलास परमार (रा. कॅम्प, पुणे) यांच्या मालकीचा आहे. दरम्यान गेल्या काही वर्षांपासून या बंगल्यामध्ये हिंदूराष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांचे वास्तव्य असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत सागर मेश्राम हा याच परिसरात असलेल्या गोशाळेत गुराख्याचे काम करत होता. त्याचा मृतदेह शुक्रवारी (दि.२४) सकाळी आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पौड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या तरुणाच्या मृत्यूचे नेमके कारण काय आहे, याबाबत पोलीस अधिक माहिती घेत आहेत.
मृतदेह सापडलेला तरूण देखील सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. मृतावर सोलापूर आणि इतर ठिकाणी त्याच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल असून तो झोपेत असतानाच बांधकामाच्या विटा आणि सिमेंटचा गट्टू त्याच्या डोक्यामध्ये घालून त्याचा खून करण्यात आला. त्याचा मृतदेह गुरूवारी ( दि.२४) रोजी सकाळी मिळून आला असून घटनास्थळी पौड पोलिसांनी धाव घेतली असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शखाली पोलिस अधिक तपास करत आहेत.