Pune Crime : धक्कादायक! सेक्स रॅकेटमध्ये अडकविण्याची धमकी; पैसे उकळले, वाघोली पोलिस ठाण्यातील 3 पोलिसांचे निलंबन

Pune Crime : धक्कादायक! सेक्स रॅकेटमध्ये अडकविण्याची धमकी; पैसे उकळले, वाघोली पोलिस ठाण्यातील 3 पोलिसांचे निलंबन
Published on
Updated on

पुणे : उच्चशिक्षित तरुण तरुणीला सेक्स रॅकेटमध्ये अडकविण्याची धमकी देत तरुणाला मारहाण करून, वाघोली पोलीस ठाण्यातील तिघा पोलिसांनी दहा हजार रुपये उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, हा प्रकार पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कानावर येताच त्यांनी या तिघा पोलिसांचे तडकाफडकी निलंबन केले आहे. पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

पोलिस हवालदार किरण अब्दागिरे, गणेश खाडे आणि किरण कांबळे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. हे तिघे पोलिस बीट मार्शल त्या दिवशी कर्तव्यावर होते. नियंत्रण कक्षाला कॉल मिळाल्यानंतर हे तरुण तरुणीला राहत असलेल्या ठिकाणे गेले. त्यानंतर त्यांना पोलिस ठाण्यात आणून धमकावत दहा हजार रुपये एका गॅरेज चालकाच्या खात्यावर घेतले.

तसेच त्या तरुणीला देखील ताटकळत पोलिस ठाण्यात उभे ठेवले. दरम्यान, जर काही गैरप्रकार होता तर त्यांच्यावर संबंधित पोलिसांनी कायदेशीर कारवाई करणे अपेक्षीत होते. मात्र त्यांनी असे न करता पैसे उकळण्याचा उद्देशाने त्यांनी असे केले. त्यामुळे तिघांच्या या वर्तनामुळे पोलिस खात्याची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवत तिघांचे निलंबन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news