

तळेगाव स्टेशन : तळेगाव दाभाडे स्टेशन भागात बुधवारी (दि. ३१) सेवाधाम हॉस्पिटलजवळ दिवसा ढवळ्या जबरी चोरी झाली. चोरट्यांनी घराचे लॉक तोडून ६ लाख ८८ हजार ७५० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबतची फिर्याद स्वाती अरुण मोडक (वय ५८) रा. सक्सेस चेंबर, पहिला मजला प्लॉट नं. ३ तळेगाव दाभाडे (स्टेशन ) ता. मावळ यांनी गुरूवारी (दि. १) तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे दिली आहे.
फिर्यादी आणि त्यांचे पती राहते घर लॉक करुन वडगाव मावळ येथे कामानिमित्त गेले होते. अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या घराचे लॉक तोडून घरात प्रवेश केला. सुमारे ६,८८७५० किंमतीचे २७.५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे ५००० किंमतीचा कॅमेरा, ४,५०० रोख रक्कम, असे एकुण ६,९८,२५० किंमतीचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.