Pune Crime News : क्रिप्टोवॉलेटची ‘की’ चोरली!

Pune Crime News : क्रिप्टोवॉलेटची ‘की’ चोरली!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : क्रिप्टोकरन्सी वॉलेटची की चोरी करून 1 कोटी 57 लाखांची फसवणूक करणार्‍या दोघांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन मोबाईल, तीन सिमकार्ड, दहा एटीएम कार्ड, युरोपियन चलनाच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. पवनकुमार रघुवीर तत्ववेदी (वय-35), पंकज रघुवीर तत्ववेदी (वय 30, दोघेही रा. उंड्री, मूळ रा. जोधपूर, राजस्थान) असे अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी उंड्री येथे राहणार्‍या एका 72 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपींचे इंजिनिअरिंगचे शिक्षण झाले असून ते टॅक्स कन्सल्टंट म्हणून काम करायचे. आरोपींनी फिर्यादी यांना क्रिप्टोमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. आरोपीं पवनकुमार आणि पंकज यांनी सुरवातीला फिर्यादी यांच्या खात्यावर ट्रेंडिंग करण्याचे आमिष दाखवून नंतर लेझर नॅनो वॉलेट खरेदी करण्याचा सल्ला दिला.

आणि त्यामध्ये क्रिप्टो करन्सी साठवून ठेवण्याची माहिती देण्याच्या बहाण्याने त्यांच्या लेझर वॉलेटचा युजर आयडी व 24 कॅरेक्टर पासवर्ड कीचा वापर करून 1 कोटी 57 लाखांचे क्रिप्टो करन्सी हे दुसर्‍या लेझर वॉलेटमध्ये वळते केले. आरोपींनी बायनान्स का क्रिप्टोला एक्सचेंजला क्रिप्टोकरन्सी गेली असल्याची माहिती तपासादरम्यान मिळाली होती. सायबर पोलिसांनी बायनान्स एक्सचेंजने झालेल्या ट्रांसजेंक्शनची माहिती दिली. यानंतर आरोपीहा दुबईला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पवनकुमार हा 16 नोव्हेंबरला भारतात परत आला. त्याच्या हालचालीवर सायबर पोलिस लक्ष ठेवून होते.

23 नोव्हेंबर रोजी आरोपी पवनकुमार जोधपूरवरून पुणे येथे येणार असल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाला होती. यानंतर सायबर पोलिसांनी आरोपीला थेट विमानतळावर जाऊन अटक केली. यानंतर त्याच्याकडे करण्यात आलेल्या तपासात त्याचा भाऊ पंकज तत्ववेदी याचा सहभाग दिसून आल्याने त्याला सुद्धा अटक करण्यात आली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक मीनल सुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक धनाजी टोणे, पोलिस अंमलदार राठोड, जमदाडे, बिराजदार यांच्या पथकाने केली.

पाकिस्तानातील एका खात्यावर क्रिप्टो करन्सी वळवली

आरोपी पवनकुमारने फिर्यादी यांची क्रिप्टो करन्सी वेगवेगळ्या 6 खात्यांवर वळविली आहेत. बायको, मेहुण्याच्या क्रिप्टो खात्यावर वळवली. तसेच एका मित्राकडून पैसे घेऊन त्याला काही क्रिप्टो करन्सी दिली आहे. याचबरोबर पाकिस्तान येथील एका खात्यावर क्रिप्टो करन्सी वळविली असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news