Pune Crime: पुण्यात प्रेमाच्या जाळ्यात खेचून डॉक्टरकडून उकळली 14 लाखांची खंडणी!

विश्रांतवाडी पोलिसात एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र
Published on: 
Updated on: 

पुणे : प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका डॉक्टरला ब्लॅकमेल करत महिलेने त्यांच्याकडून १४ लाख ३० हजार रुपयांची खंडणी उकळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

रोहिणी सुकुमार खेमाणे (वय ३२, रा. सुघोष अपार्टमेंट, गोकुळनगर, धानोरी, विश्रांतवाडी) असे गुन्हा दाखल केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत धानोरीतील 47 वर्षीय डॉक्टरांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ४७ वर्षीय डाॅक्टरांचा धानोरीतील भैरवनगर परिसरात दवाखाना आहे. आरोपी पूर्वी डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये काम करत होती. त्यातून महिलेची डाॅक्टरांशी ओळख झाली. त्यानंतर महिलेने डाॅक्टरांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर महिलेने त्यांच्याकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली.

पैसे न दिल्यास पोलिसांकडे तक्रार देईल. गुन्हा दाखल झाल्यानंतर कारागृहात जावे लागेल, अशी धमकी देऊन आराेपी महिलेने डाॅक्टरांकडून गेल्या महिनाभरात १४ लाख ३० हजार रुपये उकळले. महिलेने रुग्णालयातील कागदपत्रांची नोंद असलेली वही चोरून नेली. ही वही परत हवी असल्यास आणखी दहा लाख रुपये द्यावे लागतील, अशी धमकी देऊन पुन्हा खंडणी मागितली. महिलेच्या धमकीमुळे घाबरलेल्या डाॅक्टरांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी आरोपी महिलेच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक लोहकरे तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news