Pune Crime : भेसळयुक्त मँगो पल्पचा ३,८०० किलो साठा जप्त, अन्न व औषध प्रशासनाची राक्षेवाडी येथे कारवाई

Pune Crime : भेसळयुक्त मँगो पल्पचा ३,८०० किलो साठा जप्त, अन्न व औषध प्रशासनाची राक्षेवाडी येथे कारवाई
Published on
Updated on

राजगुरुनगर : राक्षेवाडी(ता. खेड) येथे अन्न व औषध प्रशासना (एफडीए) सोमवारी(दि. १३) मोठी कारवाई करत भेसळयुक्त मँगो पल्पचा साठा जप्त केला. खेड आणि मावळ तालुक्यातून एकूण ३,८०० किलोग्रॅमहून अधिक भेसळयुक्त मँगो पल्प जप्त करण्यात आला आहे. याची किंमत लाखो रुपये आहे.

या ठिकाणी मँगो पल्प तयार करताना आंब्याऐवजी साखरेऐवजी भेसळयुक्त पदार्थ, गाईचे दूध आणि केमिकलयुक्त केशरी रंग याचा वापर केल्याचे उघड झाले. स्वस्त दरात उपलब्ध होणाऱ्या या पल्पचा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वापर होत होता. स्थानिक हॉटेल्स, मिठाई दुकाने आणि घरगुती वापरासाठी तो पुरवला जात होता.

अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्याने सांगितले की, या भेसळयुक्त पल्पमुळे जुलाब, उलट्या, पोटदुखी आणि अन्नातून विषबाधेचा धोका होऊ शकतो. दीर्घकाळ वापरल्यास कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा देखील धोका वाढू शकतो. केमिकल रंग आणि भेसळीमुळे हे पदार्थ पूर्णपणे अपायकारक ठरले आहेत.

अन्न व औषध प्रशासनाने दोन्ही ठिकाणी छापे टाकून साठा जप्त केला आहे. नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. संबंधित उत्पादकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news