चाकण / पुणे : चाकण-तळेगाव मार्गावर खराबवाडी गावच्या हद्दीत अथर्व हॉटेल समोर भीषण अपघात झाला. निसरडा रस्ता आणि खड्ड्यांमुळे चाकणकडे येणारी दुचाकी घसरली. यावेळी तळेगावकडे जाणाऱ्या कंटेनरखाली दुचाकीवरील दोघेजण आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
चाकण एमआयडीसीतील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर बनलेला असतानाही प्रशासनाचे दुर्लक्ष कायम असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. आणखी किती जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.