Pune: Car and ST bus collide head-on; 2 people died on the spot
पुणे : कार आणि एसटी बसची समोरासमोर धडक; २ जण जागीच ठार Pudhari Photo

पुणे : कार आणि एसटी बसची समोरासमोर भीषण धडक; २ जण जागीच ठार

पुणे : कार आणि एसटी बसच्या समोरासमोरील धडकेत २ जण ठार, १५ जण जखमी

ओतूर : पुढारी वृत्तसेवा

पारनेर ते मुंबई ही एसटी बस ओतूरच्या दिशेने येत असताना ओतुरहून आळेफाट्याच्या दिशेने जाणारी ब्रीझा कार (एम. एच. ४६ सी. एम. २१५५ ) या दोन वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली. यामध्ये ब्रिझा कारचा चालक व आणखी एकजण असे दोनजण जागीच ठार झाले. एस. टी. बस (एम. एच. १४ बी. टी. ४२८०) मधील १५ प्रवासीही जखमी झाले. एकजण गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी पुणे येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.ए. टी. बसमध्ये एकूण चाळीस प्रवासी प्रवास करीत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Pune: Car and ST bus collide head-on; 2 people died on the spot
रायगड : दोन एसटी बसची समोरासमोर धडक; ३५ जण जखमी

हा भीषण अपघात आज (रविवार) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ओतूर येथील अण्णासाहेब वाघीरे महाविद्यालयाच्या नजीक घडला. दरम्‍यान या अपघातातील मृतांची नावे अद्यापही मिळू शकली नाहीत. अपघाताची खबर मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे, पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील पोलीस हवा. शामसुंदर जायभाय, मनोज कोकणी, विलास कोंधवळे व इतर पोलीस फौज फाटा घटनास्थळी हजर होऊन मदत कार्य सुरू केले. दरम्यान ब्रिझा कारचा पूर्ण चक्काचूर झाला असून जखमींना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.

logo
Pudhari News
pudhari.news