

केडगाव:दौंड तालुक्यातील केडगाव-आंबेगाव पुनर्वसन(ता.दौंड) येथे एका ११ महिन्याच्या बालकाचा त्रिशूळ डोक्यात मारून खून झाल्याची भयानक घटना गुरूवारी(दि.१०) सकाळी घडली आहे
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन मेंगावडे आणि त्याची पत्नी पल्लवी यांच्यामध्ये जोरदार भांडण सुरु होते. यावेळी पल्लवी हिने आपल्या हातातील त्रिशूलाने नितीन याला मारण्याचा प्रयत्न केला मात्र हा त्रिशूळ नितीन याने चुकविल्याने तो शेजारी भावजयीच्या कडेवर असणाऱ्या ११ महिन्याच्या बालकाच्या डोक्यात घुसला. त्रिशूलाचा प्रहार इतका भयंकर होता की यात हे ११ महिन्याचे बालक जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच यवतचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपी पल्लवी तिचा नवरा नितीन व पल्लवीच्या दिरालाही ताब्यात घेत पुढील तपास सुरु केला आहे. कोणतीही चूक नसताना या ११ महिन्याच्या बालकाला आपला जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.