पुणे : कडबनवाडी येथील युवकाचा अपघातात मृत्यू

पुणे : कडबनवाडी येथील युवकाचा अपघातात मृत्यू

शेळगाव; पुढारी वृत्तसेवा : कडबनवाडी (ता. इंदापूर) येथील शहाजी पांडुरंग उचाळे (वय ४३) या युवकाचा अपघात होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या घटनेबद्दल उचाळे यांच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहाजी उचाळे हे गुरुवारी (दि. १६) कामानिमित्त भिगवण या ठिकाणी गेले होते. संध्याकाळी ७ वाजता भिगवण येथे गावी येण्यासाठी महामार्गावर थांबले असता अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. त्यामध्ये त्याच्या डोक्याला व मेंदूला गंभीर दुखापत झाली व भिगवण येथे प्रथम उपचारानंतर त्याला लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु रविवारी (दि. १९) सायंकाळी ५ वाजता शहाजी उचाळे यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, भावजय अशा परिवार आहे. इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे उपाध्यक्ष सतीश गावडे यांचे तो भाचा होत. ते सध्या कडबनवाडी (ता. इंदापूर) येथील संजीवनी विकास सोसायटीमध्ये लिपिक म्हणून कार्यरत होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news