पुढारी माध्यम समूहाच्या राईज अप जलतरण स्पर्धेत मानाचे मेडल, आकर्षक ट्रॉफी मिळवण्यासाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे जिल्ह्यातील मुली, महिला या नेहमीच उत्सुक असतात... अशी महत्त्वाकांक्षा असणार्या मुलींसाठी पुण्याच्याच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या क्रीडाविश्वात फक्त दोन वर्षांच्या कालावधीत प्रसिद्ध झालेला, फक्त महिलांसाठी प्रसिद्ध असलेल्या पुढारी राईज अप जलतरण स्पर्धेचा तिसरा सीझन उद्या शनिवारी (दि.8 फेब्रुवारी) व रविवारी (दि.9 फेब्रुवारी 25) टिळक जलतरण तलाव, डेक्कन जिमखाना येथे होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील जलतरणप्रेमी, मुली, महिला, पालक, क्रीडाशिक्षक, प्रशिक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहात होते तीच ही जलतरण स्पर्धा... पुणे डिस्ट्रिक्ट अॅमॅच्युअर, अॅक्वेटिक असोसिएशनच्या सहकार्याने 7 वर्षे, 9 वर्षे, 11 वर्षे, 13 वर्षे, 15 वर्षे, 17 वर्षे, 30 वर्षांपेक्षा अधिक अशा सात वयोगटांमध्ये होणार्या या स्पर्धेत एकूण वैयक्तिक 47 प्रकारच्या स्पर्धा पार पडतील. विशेष बाब म्हणजे या स्पर्धेसाठी विनामूल्य प्रवेश असून आत्तापर्यंत या स्पर्धेसाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे जिल्ह्यातील स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणावर आपला प्रवेश नोंदवला आहे.
या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी सर्व पालक, शिक्षक, प्रशिक्षक, स्पर्धक यांनी टिळक जलतरण तलाव येथे आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन ‘दैनिक पुढारी’च्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेमधील यशस्वी स्पर्धकांना मेडल्स, ट्रॉफीज अशी भरघोस बक्षिसे आहेतच, पण या शिवाय सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रेदेखील मिळणार आहेत.
या स्पर्धेसाठी टायटल स्पॉन्सर माणिकचंद ऑक्सीरीच, स्किन केअर पार्टनर रूपमंत्रा तर फायनान्स पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. क्रेडिट सोसायटी, सपोर्टिंग पार्टनर म्हणून पुणे महानगरपालिका यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले आहे.
अशा स्पर्धेमधून भविष्यातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत व त्यांची कारकीर्द यशस्वी व्हावी हाच पुढारी माध्यम समूहाचा मुख्य उद्देश आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व पुणेकरांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन दै. ‘पुढारी’च्या वतीने करण्यात येत आहे.
स्पर्धा कुठे?
टिळक जलतरण तलाव, कर्वे रोड, डेक्कन जिमखाना
स्पर्धा कधी?
शनिवार (दि. 8) ते रविवार (दि.9 फेब्रुवारी 25)
स्पर्धेची वेळ:
सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत.