Pudhari Majha Bappa: रुग्ण, परिचारिका अन् डॉक्टरांनी साकारला पर्यावरणपूरक बाप्पा

दैनिक ‘पुढारी’चा पर्यावरणपूरक उपक्रम
Pudhari Majha Bappa
रुग्ण, परिचारिका अन् डॉक्टरांनी साकारला पर्यावरणपूरक बाप्पाPudhari
Published on
Updated on

पुणे: दैनिक ‘पुढारी’ने आयोजित केलेल्या ‘माझा बाप्पा’ या उपक्रमात भारती हॉस्पिटलमधील रुग्ण, परिचारिका, डॉक्टर आणि कर्मचार्‍यांनी उत्साहाने सहभागी होत शाडू मातीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारत पर्यावरणरक्षणाचा संदेश दिला.

भारती हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये दैनिक ‘पुढारी’तर्फे सोमवारी (दि. 18) इको फ्रेंडली गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत रुग्णालयातील कॅन्सरग्रस्त रुग्ण, डॉक्टर्स, सोशल वर्कर, मामा-मावशी आणि सुरक्षा रक्षक यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. (Latest Pune News)

Pudhari Majha Bappa
Pune Potholes: महापालिकेच्या पथ विभागाचा अजब कारभार; कोल्डमिक्स टाकून पावसातच बुजवले खड्डे

या वेळी भारती विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ. जयकुमार, भारती विद्यापीठ हॉस्पिटल मेडिकल कॉलेज सांगलीचे अधिष्ठाता डॉ. नितीन मुदुराज, भारती विद्यापीठ नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या डॉ. भाग्यश्री जोगदेव, उपप्राचार्य डॉ. प्रवीण दाणी, भारती हॉस्पिटलचे अधिष्ठाता प्रवीण जाधव, वैद्यकीय सामाजिक विभागप्रमुख शिल्पा महाजन व अन्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अशा प्रकारच्या जनजागृती कार्यक्रमांची गरज असल्याचे मत या वेळी अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.

या कार्यशाळेला पुणे महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विशेष सहकार्य मिळाले आहे. या कार्यशाळेचे मुख्य प्रायोजक सॉलिटर ग्रुप, सहप्रायोजक गोयल गंगा ग्रुप आहे. एज्युकेशन पार्टनर भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यापीठ पुणे, एन्व्हायर्न्मेंट पार्टनर ऑटोट्रॉनिक्स इंजिनिअरिंग प्रा. लि., को-पार्टनर आहे.

भारती हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये आज झालेल्या या कार्यक्रमात कॉलेज ऑफ फाइन आर्ट्स, भारती विद्यापीठ स्कूल ऑफ व्हिज्युअल आर्टच्या यशोवर्धन थोपटे, पार्थ कृष्णात कुंभार, प्रेरणा बागरेचा, आकाश कापूर, एकनाथ हलगुंडे, अमित मौदर्गीकर, ओंकार पवार या विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत सहभागी झालेल्यांना शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले.

Pudhari Majha Bappa
Red Alert Pune: पुण्यात पावसाचा ‘रेड अलर्ट’; महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज

कलाकृतीची निर्मिती करणे ही मुळातच एक थेरपी आहे आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडविणे ही थेरपी आपल्या स्वतःसाठीच नव्हे, तर आपल्या निसर्गासाठीदेखील परिणामकारक ठरते. या मूर्ती तयार करताना कर्करुग्णांच्या चेहर्‍यावर दिसणारा आनंद मी प्रत्यक्ष पाहिला आणि तो आनंदच कलेच्या उपचारक्षमतेची साक्ष देतो, असे मत भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलसचिव जी. जयकुमार यांनी या वेळी व्यक्त केले.

‘पर्यावरणपूरक गणपती’ हा ‘पुढारी’चा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. भारती हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेचे काम करणार्‍या सेवकांनी या उपक्रमात सहभागी होऊन पर्यावरण समतोलाचा संदेश दिला. जलप्रदूषण ही एक मोठी समस्या आहे आणि त्याचा प्रभाव माणसाच्या आरोग्यावरही पडतो.

- डॉ. संजय ललवाणी, मेडिकल डायरेक्टर, भारती हॉस्पिटल

शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती बनवून पर्यावरण समतोलाचा संदेश देणारा ‘पुढारी’चा उपक्रम अत्यंत अभिनंदनीय आहे. भारती हॉस्पिटलमध्ये हा उपक्रम राबविल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांच्या वेदनेवर फुंकर घालण्याची एक चांगली संधी मिळाली.

- डॉ. जितेंद्र ओसवाल, डेप्यु. मेडिकल डायरेक्टर, भारती हॉस्पिटल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news