Yugendra Pawar : 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अभिमान वाटतो' : युगेंद्र पवार

Yugendra Pawar PM Narendra Modi
Published on
Updated on

बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ भाजपचे नेते नाहीत, ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे मलाही त्यांचा अभिमान वाटतो. कामासाठी कोणालाही भेटणे गैर नाही. सत्तेत असणाऱ्यांना भेटून कामे मार्गी लावावी लागतात. विरोधक म्हणजे शत्रू नसतो. त्यांनी एकमेकांचे गळे धरायचे का? राजकारण असे नसते, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवानेते आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार यांनी सांगितले. एका खासगी कार्यक्रमानिमित्त बारामतीत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आमचा पक्ष भाजपसोबत जाणार का? हे आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाच विचारले पाहिजे. पण, मला वाटत नाही की, आम्ही भाजपसोबत जाऊ, असेही पवार यांनी सांगितले. ते म्हणाले की, १६ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामती दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व भाजप यांच्या समीकरणाची चर्चा रंगू लागली आहे.

यावर युगेंद्र म्हणाले की, सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती यांच्या विवाहाच्या स्वागत समारंभात मी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. एखाद्या कार्यक्रमात पंतप्रधानांची भेट झाली म्हणजे आपण त्यांच्या संपर्कात आहोत किंवा त्यावरून राजकीय समीकरणे जोडणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news