पुण्यात सदावर्ते दाम्पत्याविरोधात एसटी कामगारांचे आंदोलन

पुण्यात सदावर्ते दाम्पत्याविरोधात एसटी कामगारांचे आंदोलन
पुण्यात सदावर्ते दाम्पत्याविरोधात एसटी कामगारांचे आंदोलनFile Photo

पुणे :एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेत चुकीच्या पद्धतीने झालेली नोकरभरती, संचालकांनी नियमबाह्य पद्धतीने घेतलेला प्रवासभत्ता व उचल रकमा, डेटा सेंटरची सरकारी नियमांना डावलून राबविलेली निविदा प्रक्रिया, बँकेच्या कारभारात सदावर्ते दाम्पत्याचा वाढता हस्तक्षेप, संचालक मंडळाची मनमानी, या कारणांमुळे महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने गुरुवारी जोरदार घोषणाबाजी करत सहकार आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

सदावर्ते दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

या बाबींची गंभीरता लक्षात घेऊन सदावर्ते दाम्पत्यावर व संचालक मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची व या भ्रष्टाचारी लोकांना जेलमध्ये टाकण्याची आग्रही मागणी समितीच्या वतीने करण्यात आली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news