Red Chilli price : लाल मिरचीची आवक वाढल्याने भाव स्थिर

मिरचीची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने मावळात मिरचीचे भाव स्थिर राहिले आहेत
Red chilli
लाल मिरचीची आवक pudhari
Published on
Updated on

कामशेत : मावळातील कामशेत बाजारपेठ लाल मिरचीसाठी प्रसिद्ध आहे. एप्रिल, मे महिन्यात लाल मिरचीला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. गृहिणी उन्हाळ्यात मिरची पावडर, लाल तिखट, काळे तिखट तसेच इतर मसाल्याचे पदार्थ बनवित असतात. यामुळे उन्हाळ्यात मिरचीला मोठी मागणी असते. यामुळे मिरचीचा ठसका उडत असतो. परंतु यंदा मिरचीची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने मावळात मिरचीचे भाव स्थिर राहिले आहेत.

लवंगी, गुंडी, कश्मिरी व बेडगी इत्यादी प्रकारच्या लाल मिरच्या बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. बेडगी मिरचीला सर्वात जास्त मागणी आहे. सर्वसाधारणपणे 160 ते 180 रुपये किलोपर्यंत साध्या मिरचीचे दर आहेत. तर बेडगी मिरची 200 रुपये किलो आहे. एप्रिल महिना वाळवण व मसाल्याचे पदार्थ बनविण्याचा काळ असतो. त्यामुळे मिरचीला मागणी असते. त्यातच उन्हाळ्यात लग्नसराई असल्याने मसाल्याचे पदार्थ बनविले जातात. यामुळे मिरचीला प्राधान्य दिले जाते.

Red chilli
महिलेशी अनैतिक संबंध, पतीचा अडसर, प्रियकराने काढला काटा

मावळातील नागरिकांसाठी कामशेत ही बाजारपेठ आहे. येथे आंदर मावळ, नाणे मावळ तसेच वाड्या-वस्त्यांवरील नागरिक, महिला खरेदीसाठी येतात. स्थानिक नागरिकांसह आजूबाजूच्या तालुक्यातील व्यापारीवर्ग देखील मोठ्या प्रमाणावर मिरची खरेदी करण्यासाठी कामशेत बाजारपेठेत येतात. यामुळे कामशेतला इंद्रायणी भाताबरोबर मिरचीची बाजारपेठ म्हणून ओळखले जाते.

सध्या लाल मिरचीची आवक वाढली आहे. त्यामुळे मिरचीचे दर स्थिर आहेत. मागील वर्षी 240 च्या पुढे मिरचीचे दर होते. लाल मिरचीमध्ये लवंगी, कश्मिरी, गुंडी, बेडगी या प्रकारच्या मिरच्यांना जास्त मागणी असते. शक्यतो लाल भडक मिरचीला महिला जास्त पसंती देतात. सर्वसाधारण 160 रुपये ते दोनशे रुपये किलोपर्यंत मिरची मिळत असल्याने महिलांना मसाला बनवणे सोपे जाते आहे. सध्या लाल मिरचीला मागणी आहे.

सचिन रायसोनी, कामशेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news