शिंदे म्हणाले, कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार हा एकट्या आमदार, खासदार यांना नसतो, तो राज्य सरकार आणि केंद्र सरकारला असतो. कोणतीही गोष्ट ठरताना ती फक्त एकेका आमदार, खासदारांपुरती ठरत नाही, तर ती संपूर्ण राज्य किंवा देश समोर ठेवून तो निर्णय घेतलेला असतो. अशा वेळी कोणावर वैयक्तिक टीका करणे हे बरोबर नाही. राजकारणाचा अलिकडचा स्तर घसरलेला आहे. कोणताही मंत्री हा कोणत्याही एका भागाचा नसतो, कोणताही नेता हा एका भागाचा नसतो, तो संपूर्ण राज्य किंवा देशाचा असतो. परंतु अलिकडच्या काळामध्ये वेगळेच राजकारण पाहायला मिळत आहे. बारामतीचे नाव घेतले की प्रसिद्धी मिळते म्हणून बारामतीने पाणी पळवले, बारामतीने अमुक केले, असा अपप्रचार विरोधक करतात. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. वास्तविक आम्ही मंत्रिमंडळात असताना मराठवाड्याला पाणी देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. कुठेही कुणाचेही पाणी अडवलेले नाही असे शिंदे म्हणाले.