Pune Rave Party | पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा

आयोजकांसह ७८ जणांवर गुन्हा दाखल; लाखोंचा मद्यसाठा जप्त
Pune Rave Party |
Pune Rave Party | पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा
Published on
Updated on

पुणे : तुळापूर परिसरातील एका आलिशान रिसॉर्टमध्ये ‘प्रोजेक्ट एक्स’ या नावाखाली पहाटेपर्यंत सुरू असलेल्या हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शनिवारी पहाटे छापा टाकला आणि पार्टी उधळून लावली.

मद्याच्या नशेत बेभान झालेले सुमारे १५६ तरुण-तरुणी, कानठळ्या बसविणारे संगीत, प्रतिबंधित हुक्का फ्लेव्हर्स, गांजाचा वापर आणि परवान्याची मुदत संपल्यानंतरही सुरू असलेला धिंगाणा यामुळे या कारवाईने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सुमारे ८५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सात आयोजकांसह ७८ जणांवर गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात ‘प्रोजेक्‍ट एक्स’ तुळापूर येथील फार्महाऊसवर रेव्‍ह पार्टीचे आयोजन करणारे यश राजा चौधरी, आयमान सैफ शेख यांच्‍यासह सैफ सय्यद, सिद्धांत धुवाडी, दिशांत धुवाडी, अली रौफ पानसरे, आवेश अन्सारी यांच्‍यासह ७८ जणांवर गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. त्‍यांमध्ये १४ बाऊन्सर्स, कर्कश आवाजात ५ डीजे चालक गाणी वाजविणारे, विद्युत रोषणाई करणारे दोघे, पार्टीत सहभागी होऊन मद्याचे व अमली पदार्थाचे सेवन करणारे २२ जण, अवैधरीत्या पार्टीकरिता बंगला देणारा आरोपी नरेंद्र सुंदरलाल चुघ याच्यासह अन्य १४ जणांवर गुन्‍हे दाखल झाले आहेत.

लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तुळापूर येथे फार्महाऊसवर अनधिकृत रेव्ह पार्टी सुरू असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार दि. ७ जून (रविवार) रोजी पहाटे अडीच वाजता १५ अधिकारी आणि ६५ पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने संबंधित रिसॉर्टवर छापा टाकला. पोलिस अचानक दाखल होताच पार्टीत एकच गोंधळ उडाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news