Pneumonia in Children: न्यूमोनियाच्या त्रासाने चिमुकले बेजार

महापालिकेच्या रुग्णालयांत एरवीपेक्षा चारपट अधिक रुग्ण; बदलते वातावरण, प्रदूषणाचा परिणाम
Health News
न्यूमोनियाच्या त्रासाने चिमुकले बेजारpudhari
Published on
Updated on

पुणे : शहरात लहान मुलांमध्ये न्यूमोनियाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महापालिकेच्या रुग्णालयांत एरवीपेक्षा चारपट अधिक रुग्ण आढळत असल्याची माहिती महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. स्मिता सांगडे यांनी दिली. अनेक प्रकरणे नोंदवलीही जात नसल्याने प्रत्यक्षात रुग्णसंख्या आणखी जास्त असण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले. (Pune latest News)

बदलते वातावरण, वाढते प्रदूषण, संसर्गाचे वाढते प्रमाण, यामुळे दिवसेंदिवस लहान मुलांमधील श्वसनासंबंधी समस्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. दमा, अ‍ॅलर्जिक रायनायटिस, ब—ाँकायटिस, सततचा खोकला आणि सर्दी, घरघर, झोपेशी संबंधित तसेच श्वसनाचे विकार आणि मुलांमध्ये फुप्फुसांच्या समस्या वाढत आहेत. लहान मुलांमध्ये लक्षणांनुसार उपचार केले जातात. लक्षणे तीव्र स्वरूपाची असल्यास एक्स-रे काढला जातो.

Health News
Pune: पूरपरिस्थिती रोखण्यासाठी 369 कोटींच्या आराखड्याला मंजुरी

प्रतिबंधात्मक उपाय

  • लहान मुलांना वेळेवर लसीकरण करावे

  • घरात स्वच्छता राखावी

  • घरात कोणी आजारी असल्यास

  • मुलांना दूर ठेवावे

  • पौष्टिक आहार द्यावा

  • थंड हवेत मुलांना

  • गरम कपडे घालावेत

  • शाळेत जाणार्‍या मुलांनी

  • मास्कचा वापर करावा

  • कोमट पाणी प्यावे, थंड पदार्थ टाळावेत

पाच वर्षांखालील मुलांमध्ये न्यूमोनिया प्रामुख्याने जास्त आढळत आहे. खोकला, सर्दी, ताप, श्वास घेण्यास त्रास, ऑक्सिजनची पातळी कमी होणे, मुलगा किंवा मुलगी सतत सुस्त राहणे, खाणे कमी करणे, दूध कमी पिणे, ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. अशी चिन्हे दिसताच पालकांनी तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

- डॉ. स्मिता सांगडे, बालरोगतज्ज्ञ, कमला नेहरू रुग्णालय

बदलती जीवनशैली व त्यामुळे मैदानी खेळांचे प्रमाण कमी झाले आहे. मुलांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. वाहनांमुळे होणारे प्रदूषण, धूळ आणि औद्योगिक उत्सर्जनामुळे होणारे प्रदूषण फुप्फुसांवर विपरीत परिणाम करते. श्वसनविषयक अ‍ॅलर्जी असलेल्या मुलांमध्ये अनेकदा निदानास विलंब होतो. कारण, वातावरण बदलल्याने ही समस्या उद्भवल्याचा गैरसमज पालकांमध्ये आढळून येतो आणि त्याकडे दुर्लक्ष केले जाते. वेळीच तपासणी आणि योग्य काळजी घेतल्यास न्यूमोनियासारखी गंभीर परिस्थिती टाळता येऊ शकते.

- डॉ. अभिमन्यू सेनगुप्ता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news