

PMPML new buses
पुणे : पीएमआरडीएकडून पीएमपीला नवीन बस खरेदीसाठी तब्बल 230 कोटी रुपये नुकतेच प्राप्त झाले आहेत. यामुळे पीएमपीच्या ताफ्यात लवकरच आणखी 500 नवीन बस दाखल होणार असून, पीएमआरडीए भागातील प्रवाशांसह पुणे-पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.
पीएमआरडीएने दिलेल्या या मोठ्या निधीमुळे पीएमपी आता 500 नवीन बस खरेदी करणार आहे. या बसमध्ये आधुनिक सोयीसुविधा असणार आहेत. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी आणि सुरक्षित होईल. नवीन बस दाखल झाल्यावर पीएमपीच्या ताफ्यातील जुन्या आयुर्मान संपलेल्या बस बदलण्यास देखील मोठी मदत होणार आहे.
पीएमपीकडून पीएमआरडीएच्या हद्दीतील देहू-आळंदी, लोहगाव, हडपसर, वाघोली, पिंपरी-चिंचवड, वेल्हा, सासवड यासह अन्य काही भागांमध्ये सेवा पुरवण्यात येत आहे. या वाढलेल्या बस मार्गांमुळे पुणेकरांना बस कमी पडत होत्या. त्यामुळे पीएमआरडीएकडून झालेल्या या मदतीमुळे पीएमपीला काही प्रमाणात का होईना हातभार लागणार आहे.
आरामदायक सीट्स
दिव्यांगांसाठी विशेष सोय
सीसीटीव्ही कॅमेरे
जीपीएस प्रणाली
प्रवाशांसाठी माहिती फलक
पीएमआरडीएने पीएमपीला 223 कोटी रुपयांचा निधी दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. या निधीमुळे आम्ही 500 नवीन बस खरेदी करू शकणार आहोत. यामुळे पीएमपीच्या सेवेची गुणवत्ता सुधारेल आणि पीएमआरडीए भागातील प्रवाशांना अधिक चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल.
नितीन नार्वेकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल