Pune Missing Child Case: बसमध्ये चुकलेला १० वर्षांचा तेजस सुखरूप आई-वडिलांच्या कुशीत; पीएमपी कर्मचाऱ्यांची तत्परता

खराटे कुटुंब चिंचवडकडे जाणाऱ्या बसमधून प्रवास करीत होते. कर्वेनगर येथे अचानक उतरण्याचा निर्णय झाला.
Pune Missing Child Case
Pune Missing Child CasePudhari
Published on
Updated on

पुणे: धावपळीच्या पीएमपी प्रवासात क्षणभराची नजरचूक झाली आणि १० वर्षांचा तेजस बसमध्येच राहिला. काही वेळांतच लहानग्या तेजसचे धास्तावलेले मन आणि आई-वडिलांची तुटणारी आशा... पण, पीएमपीच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे आणि माणुसकीमुळे या कथेचा अंत सुखात झाला. अन् तेजस पुन्हा आई-वडिलांच्या कुशीत सुखरूप पोहोचला.

खराटे कुटुंब चिंचवडकडे जाणाऱ्या बसमधून प्रवास करीत होते. कर्वेनगर येथे अचानक उतरण्याचा निर्णय झाला. चढ-उताराच्या गर्दीत आणि घाईगडबडीत १० वर्षांचा तेजस पुंडलिक खराटे बसमध्येच राहून गेला. बस निघून गेली आणि मुलगा जवळ नाही, हे लक्षात येताच आई-वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली.

Pune Missing Child Case
Pune FDA Action: तीन हॉटेलां­वर एफडीएची कारवाई; अंगणवाड्यांना पुरवठा करणाऱ्या साठ्यामध्ये दोष

मुलगा चुकल्याची माहिती मिळताच बसचे वाहक गणेश रांगडे (बॅच क्र. २९९८), चालक आणि तपासणी पथकाने एका क्षणाचाही विलंब न करता शोधमोहीम सुरू केली. तेजस दिसल्यावर पीएमपी कर्मचाऱ्यांनी अत्यंत प्रेमाने त्याला जवळ घेत धीर दिला. त्याला सुरक्षितपणे कर्वेनगर पोलिस चौकीत नेण्यात आले.

पोलिस उपनिरीक्षक नायकवाडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून तेजसला त्याचे वडील पुंडलिक खराटे आणि आई सीमा खराटे यांच्या सुखरूप स्वाधीन करण्यात आले.

Pune Missing Child Case
Pune Road Potholes: खड्डे बुजवा; अन्यथा रस्त्यावर उतरू! आठवड्याची मुदत

आपल्या काळजाचा तुकडा सुरक्षित दिसताच आई-वडिलांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले. या कामगिरीबद्दल कोथरूड आगार व्यवस्थापक सचिन वाबळे यांनी वाहक गणेश रांगडे आणि लिपिक नितीन सुरेश पगारे यांचे कौतुक केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news