

PM Kisan scheme benefit only for wife
पुणे: पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजेच पीएम-किसान योजनेत केंद्र सरकारने नवा नियम लागू केला आहे. त्यानुसार पती-पत्नी अशा दोघांच्या नावे शेतजमीन असेल, तर या योजनेचा लाभ आता फक्त पत्नीलाच दिला जाणार आहे.
या योजनेंतर्गत सहा हजार रुपये वार्षिक निधी शेतकऱ्यांना दिला जातो. तथापि, केंद्राने नियम कडक करून पत्नीलाच हा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. पीएम-किसान योजनेचा 20 वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी वितरित करण्यात आला आणि राज्यातील 92 लाख 91 हजार शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला. मात्र, नव्या नियमामुळे सुमारे साठ हजार लाभार्थ्यांचे पैसे रोखले गेले आहेत. (Latest Pune News)
कुटुंबातील एकालाच लाभ
नव्या नियमानुसार, या योजनेचा लाभ पती, पत्नी आणि त्यांची 18 वर्षांखालील मुले अशा चौघांपैकी एकालाच घेता येईल. पती-पत्नीच्या नावावर शेतजमीन असेल, तर पतीचा हप्ता बंद करून पत्नीचा सुरू ठेवला आहे. मुलगा-मुलगी यांनाही स्वतंत्र हप्ता यापुढे दिला जाणार नाही.