Fake Liquor | तब्बल पंधरा लाख लिटर बनावट मद्यनिर्मिती करण्याचा डाव उधळला

कुरकुंभ एमआयडीसीमध्ये अमली पदार्थविरोधी पथकाची धडक कारवाई
दौंड : कुरकुंभ एमआयडीसीत अमली पदार्थविरोधी पथकाने छापा टाकून रसायनांचा मोठा साठा जप्त केला.
दौंड : कुरकुंभ एमआयडीसीत अमली पदार्थविरोधी पथकाने छापा टाकून रसायनांचा मोठा साठा जप्त केला.
Published on
Updated on

दौड : पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसी परिसरात अमली पदार्थविरोधी पथकाने विषारी व बनावट दारूनिर्मितीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत समर्थ लॅबोरॅटरीज येथे अवैध कारखान्यावर छापा टाकून तब्बल ३ हजार ४२० किलो क्लोरल हायड्रेट आणि त्याच्या निर्मितीसाठी वापरले जाणारे ५ हजार ८०० लिटर रॉ केमिकल जप्त करण्यात आले आहे.

अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स, कोल्हापूर कृती विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सुमारे दीड महिन्यापासून या ठिकाणी गुप्त पाळत ठेवण्यात आली होती. त्यानंतर २९ जून २०२६ रोजी कारवाई करण्यात आली. तपासादरम्यान संशयित ठिकाणी मोठ्या प्रमाणात पिवळसर रंगाचा स्फटिकासारखा पदार्थ व रसायने आढळून आली. या रसायनांचा अहवाल आल्यानंतर ही माहिती उघड करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये किशोर दत्तात्रय सुर्वे, शैलेश विठ्ठल ठाकूर, नबी सरवर जमीर सिद्दिकी आणि आदेश विठ्ठल पाचांगणे यांचा समावेश आहे.

१५ लाख लिटर विषारी दारूनिर्मितीची क्षमता

पुणे येथील प्रादेशिक न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जप्त करण्यात आलेला पदार्थ क्लोरल हायड्रेट असल्याचे स्पष्ट झाले आहे. या रसायनाचा वापर विषारी व बनावट दारू तयार करण्यासाठी केला जातो. पोलिसांच्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेल्या ३ हजार ४२० किलो क्लोरल हायड्रेटपासून सुमारे १५ लाख लिटर विषारी दारू तयार होऊ शकली असती. या ठिकाणी उत्पादनासाठी वापरली जाणारी सेंट्रिफ्युगल मशिन आणि जीएलआर मशिनदेखील जप्त करण्यात आली आहे. या यंत्रसामग्रीची किंमत अंदाजे एक कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news