Pimpri News : एफडीएकडून घेतले जाताहेत मिठाईचे नमुने

Pimpri News : एफडीएकडून घेतले जाताहेत मिठाईचे नमुने
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) वतीने मिठाईचे नमुने घेतले जात आहेत. त्यामध्ये भेसळ आढळल्यास संबंधित मिठाई विक्रेत्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे. दिवाळी सणाला भारतीय परंपरेत विशेष महत्त्व आहे. या सणानिमित्त कुटुंबीयांसाठी तसेच मित्र परिवार, नातेवाईक आदींना देण्यासाठी विविध प्रकारची मिठाई खरेदी केली जाते.
पेढे, लाडु, चकली, तयार फराळाचे पदार्थ, बंगाली मिठाई आदींना चांगली मागणी असते. ही मिठाई बनविण्यासाठी वापरण्यात येणारा रवा, खवा, तेल, तुप, बेसन, चकली पीठ आदींचे नमुने घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती एफडीएचे सह आयुक्त (पुणे विभाग) सुरेश अन्नपुरे यांनी दिली.

अधिकृत परवाना आहे का? हे तपासा

स्वयंसेवी संस्थांकडून दिवाळीनिमित्त गरीब व्यक्तींना फराळाच्या पदार्थांचे वाटप करण्यात येते. हे फराळाचे पदार्थ तयार करणार्या व्यक्तींकडे अधिकृत परवाना आहे का, हे तपासूनच त्यांच्याकडून स्वयंसेवी संस्थांनी फराळाचे पदार्थ घ्यावे, असे आवाहन एफडीएच्या वतीने करण्यात आले आहे.
एफडीएकडून सध्या मिठाई बनविण्यासाठी वापरण्यात येणार्या विविध जीवनावश्यक वस्तूंचे नमुने घेतले जात आहेत. हे नमुने तपासल्यानंतर त्यामध्ये भेसळ आढळल्यास नियमानुसार संबंधितांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल.
– सुरेश अन्नपुरे, 
सहआयुक्त, एफडीए 
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news