पिंपरी : महापालिकेची लगीनघाई

पिंपरी : महापालिकेची लगीनघाई

पिंपरी : मिलिंद कांबळे : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागास सन 2021-22 या वर्षातील एकूण 1 हजार 329 कोटी 74 लाखांची बिले आहेत.

तर, अर्थसंकल्पात 950 कोटींचे टार्गेट त्या विभागास आहे. गेल्या 11 महिन्यांत 406 कोटी 72 लाखांची वसुली कर संकलन विभागास करता आली आहे.

अधिकार्‍यांची तडकाफडकी बदली, विभागाची कार्यक्षमता, बिलांचे उशिराने वितरण आणि वसुलीचा पूर्व अनुभव लक्षात घेता मार्चमधील 31 दिवसांमध्ये तब्बल 923 कोटींची वसुली होणे अशक्य आहे.

पालिकेकडे 5 लाख 68 लाख मिळकतींची नोंद आहे. आतापर्यंत सुमारे सव्वादोन लाख मिळकतधारकांनी कर भरणा केला आहे. जवळजवळ निम्म्यापेक्षा अधिक मिळकतधारकांनी वर्ष संपत आले तरी, कर जमा केलेला नाही.

तसेच, एक लाखांवर थकबाकी असलेले 24 हजार 304 मिळकतधारक आहेत. त्यात निवासी मिळकती 11 हजार तर, उर्वरित 13 हजार मिळकती या बिगरनिवासी आहेत. त्यांच्याकडून तब्बल 1 हजार 300 कोटींची वसुली प्रलंबित आहे.

तर, शास्तीकर लागू असलेल्या 94 हजार 173 मिळकती असून, त्यांच्याकडून शास्तीकरासह तब्बल 723 कोटी 7 लाखांची बिले थकीत आहेत. शास्तीकर वगळून मूळ कर घेतला जात नसल्याने नागरिक बिल भरत नसल्याचे चित्र आहे.

त्यामुळे अपेक्षित वसुली होत नाही, असे उत्तर कर संकलन विभागाकडून दिले जात आहे.

https://youtu.be/CC-Mfl9S1j8

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news