Pimpri : उद्योगनगरीत मराठी नाट्य संमेलनाची लगबग

Pimpri : उद्योगनगरीत मराठी नाट्य संमेलनाची लगबग
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 6 व 7 जानेवारी 2024 रोजी उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आयोजित करण्यात आले आहे. संमेलन चिंचवड येथील मोरया गोसावी क्रीडा संकुल येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर तयारीने वेग घेतल्याचे दिसते. अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या वाटचालीतील हे शतकी संमेलन असल्याने या संमेलनाला विशेष महत्त्व आहे. राज्यभरात या नाट्य संमेलनाचे कार्यक्रम घेतले जाणार आहेत.

आठवड्याभरावर येऊन ठेपलेल्या या नाट्य संमेलनाच्या मुख्य सभामंडपाचे काम मोरया गोसावी क्रीडा संकुलवर जोरदार सुरू आहे. मुख्य सभामंडपांतील काम 50 टक्के पूर्ण झाले असून, 1 जानेवारीपर्यंत संमेलन स्थळांवरील संपूर्ण काम पूर्ण होईल, असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. तर मुख्य सभामंडप हा 60 बाय 80 फूट इतका मोठा बांधण्यात आला आहे. तसेच लहान मुलांच्या कार्यक्रमासाठी भव्य बालमंचदेखील उभारण्यात येत आहे.

तब्बल दोन दिवस उद्योग नगरीत रंगणार्या या 100 व्या अ . भा. म. नाट्य संमेलनासाठी आयोजक भाऊसाहेब भोईर म्हणाले, नाट्य संमेलनाच्या तयारीने आता वेग घेतला आहे. मुख्य सभामंडप आणि बालमंच या शिवाय पिंपरी – चिंचवड शहरातील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह (चिंचवड), निळू फुले नाट्यगृह (सांगवी), गदिमा नाट्यगृह (प्राधिकरण), अंकुशराव लांडगे नाट्यगृह (भोसरी) असे एकंदरीत सहा ठिकाणी 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्ये रंगभूमीवर गाजलेली व्यावसायिक नाटके, बालनाट्य, उल्लेखनीय एकांकिका, प्रायोगिक नाटके, संगीत रजनी, संगीत नाटक यांसह 64 विविध सांस्कृतिक व नाट्यविषयक कार्यक्रम व नाटकांचे सादरीकरण होणार आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news