

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने एकाची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी मंगळवारी (दि. 26) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल सीताराम घुले (43, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अजय चंद्रसेन पिल्लई (रा. चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना शाहूनगर येथील एक फ्लॅट विकत देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून 21 लाख रुपये घेतले.
त्यानंतर त्यांना फ्लॅट न देता त्यांची फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.