

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : घरगुती कारणावरून विवाहितेच्या शारीरिक व मानसिक छळ प्रकरणी सासरच्या सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार ऑक्टोबर 2020 ते 5 एप्रिल 2022 या कालावधीत आंबेगाव तालुक्यातील गिरवरी येथील पांडुरंग वाडी येथे घडला. याप्रकरणी 29 वर्षीय विवाहितेने माहेरी आल्यानंतर चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, पती संदेश मधुकर डांगले (वय 34), सासरे मधुकर नामदेव डांगले (वय 65), सासू (वय 62), नणंद (वय 40), नणंदेचा पती (वय 39) यांच्यासह अन्य एका नातेवाईक महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला .
फिर्यादी महिला सासरी नांदत असताना आरोपींनी आपसात संगनमत करून त्यांना घरगुती कामाचे कारण काढून मारहाण व शिवीगाळ केली.
तसेच, नणंदेच्या पतीला चहा करून देत नाही, या कारणावरून वारंवार शिवीगाळ केली. एका नातेवाईक महिलेने विवाहिता आणि त्यांच्या आईचे रेकोर्डिंग करून सासरच्या मंडळींना पाठवले. त्यामुळे सासरच्यांनी विवाहितेला त्रास दिला, असे फिर्यादीत नमूद आहे.