पिंपरी : खून प्रकरणी दोघांवर गुन्हा

पिंपरी : खून प्रकरणी दोघांवर गुन्हा
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : तरुणाच्या खून प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 3) दुपारी धावडेवस्ती, भोसरी येथे घडली.

आसिफ सय्यद (24, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याचा मित्र स्वराज गवारगुर (वय 21) यांच्यावरही आरोपींनी खूनी हल्ला केला.

विशाल उर्फ जीवन कवळकार (वय 28) आणि कृष्णा मोरे उर्फ एमके (30, दोघेही रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. विशाल संतोष गायकवाड (21, रा. महात्मा फुले नगर, भोसरी) यांनी रविवारी (दि. 3) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल गायकवाड यांचा रविवारी वाढदिवस होता. त्यानिमित्त त्याने त्याच्या मित्रांना जेवण करण्यासाठी सम्राट हॉटेल येथे नेले होते.

जेवण झाल्यावर आरोपी विशाल आणि मयत आसिफ सय्यद यांच्या किरकोळ कारणावरून भांडण झाले. यावेळी चिडलेल्या आरोपी विशालने साथीदार कृष्णा मोरे त्याच्या मदतीने काचेची बाटली फोडून ती आसिफ सय्यद यांच्या मानेवर मारली.

तसेच आसिफच्या मदतीला आलेला त्याचा मित्र स्वराज गवारगुर याच्याही पाठीवर आरोपीने टोकदार बाटलीने वार केले. त्यानंतर आरोपी पळून गेले.

गंभीर जखमी झालेल्या आसिफ यास वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news