पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : तिघांनी मिळून बाप- लेकाला घरात घुसून बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 24) रात्री साडेनऊच्या सुमारास ज्ञानेश्वर कॉलनी, आकुर्डी येथे घडली.
सिरातुल्ला हसमुल्ल टेलर (55, रा. आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, इरशाद रफिक सलमानी (वय 22), सौजाद रफिक सलमानी (वय 32), सदाम शौकतअली सलमानी (35, रा. आकुर्डी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इरशाद फिर्यादी यांच्या घरात आला. त्याने काहीही कारण नसताना फिर्यादी यांच्या घरातील भांडी फेकून देत शिवीगाळ केली.
याबाबत फिर्यादी यांच्या मुलाने जाब विचारला असता आरोपीने त्याच्या दोन साथीदारांना बोलावून फिर्यादी व त्यांच्या मुलाला बेदम मारहाण केली. आरोपी इरशाद याने फिर्यादी यांच्या मुलाच्या कानाचा कडाडून चावा घेतला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.