पिंपरी : इदगाह मैदानावर सामुहिकरित्या नमाज पठण

Pimpri: Collective recitation of Namaz at Idgah Maidan
Pimpri: Collective recitation of Namaz at Idgah Maidan
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कोरोनाकाळातील दोन वर्षानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील 160 हून अधिक मशीद व मदरसांमधील मौलानाच्या नेतृत्वाखाली मुस्लिम बांधवांनी सामुहिकरित्या नमाज पठण केले. त्यानंतर एकमेकांना गळाभेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.

कोरोनाच्या प्रादुर्भात दोन वर्षे सामुहिकरित्या नमाज पठणावर निर्बंध होते. त्यावेळी मौलवींना आणि काही मोजक्या नागरिकांना मशीद व मदरसांमध्ये नमाज अदा करण्यास परवानगी होती. मुस्लिम बांधवांनी घरीच नमाज पठण करुन साधेपणाने ईद साजरी केली होती.

यंदा मुस्लिम बांधवांमध्ये ईदचा उत्साह द्विगुणित झाला होता. सामाजिक शांतता आणि सर्वधर्मियांच्या सुखासाठी प्रार्थना करत शहरातील मुस्लिम बांधवांनी सर्वधर्मियांच्या सुखासाठी प्रार्थना करत ईद- उल- फित्रची(रमजान ईदची) नमाज आज (मंगळवारी) अदा केली.

रमजान हा इस्लामिक चांद्र पंचांगातील नववा महिना आहे. या काळात सूर्योदयापासुन सुर्यास्तापर्यंत उपवास करुन रोजा पाळला जातो. महिनाभर रोजे पाळून इंद्रिये आणि मनावर संयम ठेवण्याचा आणि बंधुत्वाचा संदेश देण्यात येतो.

मंगळवारी सकाळीच मुस्लिम बांधव नवीन कपडे परिधान करून जवळच्या मस्जिद व मदरसामध्ये गेले. चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी, चिंचवड स्टेशन, मोहनननर, चिखली घरकुल, खराळवाडी, पिंपरी, नेहरूनगर, इंद्रायणीनगर, लांडेवाडी, भोसरी, पिंपरी, काळेवाडी, कस्पटेवस्ती,

थेरगाव-वाकड, काळाखडक, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, नवी सांगवी, जुनी सांगवी, निगडी, आकुर्डी, दळवीनगर, कासारवाडी, दापोडी आदी परिसरात मस्जिद व मदरसामध्ये मौल्लानांनी मुस्लिम बांधवांना नमाज पढविला, नमाजानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना अलिंगन देवून ईदच्या शुभेच्छा दिल्या.

मंगळवारी ईदच्या दिवशी पहाटे मुस्लीम बांधवांनी लवकर उठून 'फजर'ची नमाज पठण केली. त्यानंतर विविध ईदगाहमध्ये सकाळी साडेआठ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वेगवेगळ्या वेळेत ईदची नमाज पठण केली आणि अल्लाहजवळ 'दुआ' मागितली.

दुआ संपल्यानंतर प्रत्येक जण एकमेकांना आलिंगन देत 'ईद मुबारक' असे म्हणत ईदच्या शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा देतानाच 'शीरखुर्मा'साठी एकमेकांना न विसरता आमंत्रण दिले.

ईदच्या दिवशी प्रत्येक मुस्लीम बांधवाच्या घरी हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे शीरखुर्मा. दूध, शेवया आणि विविध प्रकारच्या सुका मेव्याचे मिश्रण असलेला शीरखुर्मा ईदच्या उत्सवाचा आनंद द्विगुणित करतो. शीरखुर्म्याची लज्जत चाखण्याकरता सकाळपासून रात्री उशिरापर्यंत प्रत्येक मुस्लीम बांधवाच्या घरात लगबग सुरू होती.

रोजा पाळणारी लहान मुले ईदच्या उत्साहात तल्लीन होऊन गेली होती. महिनाभर रोजा पाळणार्‍या चिमुकल्यांचे ईदच्या दिवशी खूप लाड केले जातात.

छोटयांना शुभेच्छा देण्यासाठी विविध भेटवस्तूही दिल्या जातात. ईदच्या दिवशी महिला, तरुणी आणि लहान मुलींनी देखील नव्या कपडे परिधान करुन हातावर नक्षीदार मेहंदी रेखाटून या आनंदाने ऐकमेकींना ईदच्या शुभेच्छा दिल्या. आनंदाने भरलेला आणि हेवेदावे, भेदभाव नष्ट करून सर्वाची मने जोडणारा असा हा रमजान ईद सण शांततेत साजरा झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news