Pimpri Chinchwad School Books: पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांसाठी 1.62 लाख पुस्तके दाखल; बालभारती पुरवठा पूर्ण

समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना 15 जूनपासून मोफत पाठ्यपुस्तके मिळणार; शिक्षण विभागाची तयारी पूर्ण
Pimpri Chinchwad School Books
Pimpri Chinchwad School BooksPudhari
Published on
Updated on

पिंपरी: महापालिकेच्या शिक्षण विभागाने समग््रा शिक्षा अभियानांतर्गत बालभारतीकडे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 1 लाख 62 हजार पुस्तकांची मागणी केली होती. त्यानुसार, बालभारतीकडून महापालिकेला पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी आणि पिंपरीतील उन्नत केंद्रावर ही पुस्तके दाखल झाली आहेत.

Pimpri Chinchwad School Books
Shirde Dam Drowning: शिरदे धरणात बुडून आयएसबीएम कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

बालभारतीकडून शिक्षण विभागाला पुस्तकांचा पुरवठा

पुढील महिन्यात 15 जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. त्यानुसार, महापालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या शहरातील शाळांमध्ये नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात नवी कोरी पुस्तके पडणार आहेत. यासाठी शालेय साहित्य खरेदी करण्याची लगबग महापालिका शिक्षण विभागाने सुरू केली आहे.

Pimpri Chinchwad School Books
Pimpri Chinchwad Waste to Energy Project: पिंपरी-चिंचवड मोशी प्रकल्पातून 14 मेगावॅट वीज व सीएनजी निर्मिती; कचऱ्यापासून ऊर्जा क्रांती

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके देण्यासाठी शिक्षण विभागाने हे नियोजन केले आहे. समग््रा शिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी महापालिका, अनुदानित, विनाअनुदानित व खासगी शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शाळांच्या मागणीनुसार केंद्रावरून पुस्तकांचे गठ्ठे वितरित करण्यात येतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news