पिंपरी : सिमेंटच्या गट्टूने चोरट्याने केली मारहाण
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : तीन चोरट्यांनी तरुणाचा मोबाईल फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी तरुणाने प्रतिकार केला असता चोरट्यांनी तरुणाला सिमेंटच्या गट्टूने मारहाण करून जखमी केले.
ही घटना शुक्रवारी (दि. 22) रात्री सव्वाआठ वाजता वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे घडली.रमेश नारायण खारमाटे (वय 28, रा. तळेगाव-दाभाडे, मूळ रा. अहमदनगर) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी त्यांनी शनिवार (दि. 23) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हे त्यांच्या जुन्या रूमजवळ गुरुद्वारा चौक येथे एमपीएससीची जुनी पुस्तके आणण्यासाठी शुक्रवारी रात्री सव्वा आठ वाजता जात होते.
ते गुरुद्वारा चौकातील रेल्वे बोगद्याच्या खाली आले असता तीन अनोळखी चोरट्यांनी त्यांचा मोबाईल फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी खारमाटे यांनी आरोपींना प्रतिकार केला.
एकाने रमेश यांचे हात पकडले तर दुसर्याने सिमेंटचा गट्टू त्यांच्या डोक्यात मारला. यात रमेश गंभीर जखमी झाले आहेत.

