

देहूगाव : पुढारी वृत्तसेवा : देहूगाव वैकुंठभूमी येथील नगरपंचायत कार्यालयासमोर गुरुवारी दुपारी विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वागत करण्यात आले. विकसित भारत संकल्प यात्रेच्या अनुषंगाने विविध शासकीय योजनांची माहिती देणार्या चित्रफिताचे नगराध्यक्ष पूजा दिवटे, मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, नगरसेविका यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. या वेळी उपनगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी नागरिकांनी विकसित भारत संकल्पाची शपथ घेतली. विकसित भारत संकल्प यात्रेच्या अनुषंगाने विविध शासकीय योजनांची माहिती देणारी चित्रफित या वेळी दाखविण्यात आली. नगरपंचायतीच्या वतीने केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, उज्वला योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, बँकामार्फत विविध कर्ज योजना, आरोग्य शिबिर व आधार कार्ड अद्यावतीकरण योजना अशा विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल उभारण्यात आले होते. त्यामध्ये अनेक लाभार्थ्यांनी नाव नोंदणी करीत लाभ घेतला.
हेही वाचा