

Devendra Fadnavis ethanol blending
पुणे : पेट्रोल मध्ये इथेनॉल टाकायचे की नाही यावर प्रथम निर्णय माजी पंतप्रधान अटबिहारी वाजपेयी यांच्याच काळात झाला. प्रथम 5 टक्के नंतर 10 ते 20 टक्के तर आता 25 टक्के ब्लेंडीग करण्यावर विचार सुरु आहे. हरित इंधना बाबत मी एक नोट घेतली आहे. त्याचे सुधारित धोरण लवकरच तयार होणार आहे. पुण्यातील प्राज उद्योग समुहासारख्या कंपन्यांनी हे संशोधन केल्याने देशाचे सुमारे 20 लाख कोटींचे परकीय चलन वाचले असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे काढले.
पुण्यातील प्राज उद्योग समुहाचे संस्थापक डॉ. प्रमोद चौधरी यांनी त्यांच्या उद्योजकीय प्रवासावर लिहीलेल्या पुस्तक प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री फडणवीस आले होते.
सीओईपी महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कर्यक्रमात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अ.भा.साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलींद जोशी,प्राज कंपनीचे अध्यक्ष अतुल मुळे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
यावेळी फडणवीस यांनी डॉ.चौधरी यांची जिद्द आणि चिकाटीचे कौतुक करीत उद्योग समुहाचा विस्तार कसा केला ते सांगितले. ते म्हणाले, जैवइंधन क्षेत्रात प्राज सारख्या कंपन्यांनी केलेल्या प्रयोगांमुळे आपण ख-या अर्थाने आत्मनिभर होत आहोत. पेट्रोल मध्ये इथेनॉल टाकण्याचा निर्णय प्रथम माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या कार्यकाळात झाला. त्यानंतर 2014 रोजी मोदी सरकर आल्यानंतर आणखी वेगाने निर्णय झाले.
आता पेट्रोल मध्ये इथेनॉलचे ब्लेंडिंग 20 वरुन 25 टक्यांवर कसे न्यावे लागेल या बाबत मी डॉ.चौधरी यांच्याकडून एक नोट घेतली आहे. याबाबत राज्यशासन हरित धोरण तयार करीत आहे. असेही त्यांनी सांगितले.
यावेळी प्राज कंपनीचे संस्थापक डॉ.प्रमोद चौधरी,प्रा.मिलींद देशपांडे यांचीही भाषणे झाली.