High-value homes growth | कोटीतील घरांचा टक्का वाढला!

देशातील सात महानगरांत 3.48 लाख घरांची विक्री
High-value homes growth
High-value homes growth | कोटीतील घरांचा टक्का वाढला!
Published on
Updated on

पुणे : नवी दिल्ली, मुंबई, पुण्यासह देशातील सात महानगरांमध्ये गत कॅलेंडर वर्षात (2025) तीन लाख 48 हजार 207 घरांची विक्री झाली आहे. त्यातील निम्म्याहून अधिक घरे एक कोटी रुपयांवरील आहेत.

प्रशस्त आणि अधिक सुविधाजनक घरांना मागणी वाढली आहे. त्यामुळे 50 लाख रुपयांच्या आतील परवडणार्‍या श्रेणीतील घरांचा टक्का कमी होत आहे. परिणामी एक कोटीहून अधिक किंमत असलेल्या घरांच्या विक्रीत 2024 च्या तुलनेत 14 टक्क्यांनी वाढ झाली असून 50 लाख रुपयांखाली किंमत असलेल्या घरांच्या विक्रीत 17 टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच 50 लाख ते एक कोटी रुपयांच्या दरम्यान किंमत असेल्या घरांची विक्रीही आठ टक्क्यांनी घटल्याची माहिती नाईट फ्रँक इंडियाच्या ताज्या अहवालात देण्यात आली आहे.

देशातील सात महानगरांपैकी मुंबई आणि पुण्यातील घरांची एकत्रित विक्री एक लाख 52 हजार 56 होते. देशातील सात महानगरांतील एकूण विक्रीच्या 43 टक्के वाटा या दोन शहरांचा आहे. मुंबईतील घरांची विक्री एक टक्क्याने घटून 97 हजार 188 वर आली असून, पुण्यातील घरांची विक्री तीन टक्क्यांनी घटून 50,921 वर आली आहे. बंगळूर येथील घरांची विक्री 55,373 वर स्थिर राहिली. नवी दिल्लीतील घरांची विक्री 9 टक्क्यांनी घटून 52 हजार 452 वर आली. अहमदाबाद 38,403 (4 टक्के वाढ), कोलकाता 18,752 (2 टक्के वाढ), हैदराबाद 18,262 (12 टक्के वाढ) आणि चेन्नईत 16,896 (3 टक्के घट) घरांची विक्री झाली.

परवडणार्‍या घरांची परवड

गत कॅलेंडर वर्षात (2025) परवडणार्‍या श्रेणीतील घरांचा पुरवठा कमी राहिला. विकासकांनी कमी किमतीच्या गृह प्रकल्पात फारशी गुंतवणूक केली नाही. त्यामुळे 50 लाखांपेक्षा कमी किमतीच्या नवीन घरांच्या उभारणीत वार्षिक 28 टक्क्यांची घट झाली आहे. तसेच 50 लाख ते एक कोटी रुपयांच्या रुपयांच्या श्रेणीत नऊ टक्क्यांनी घट नोंदवण्यात आली.

कोटीच्या घरांची उभारणी वाढली

देशात एक कोटी रुपयांच्या आतील घरांची उभारणी घटल्याचे दिसून येत आहे. त्याउलट एक कोटी ते दोन कोटी रुपये किंमत असलेल्या शिल्लक घरांचा टक्का 14 ने वाढून 1 लाख 29 हजार 761 झाला आहे. तर दोन ते पाच कोटी रुपये किंमत असलेल्या घरांचा वाटा 40 टक्क्यांनी वाढून 52 हजार 322 झाला आहे. पाच ते दहा कोटी श्रेणी वगळता त्यावरील सर्वच श्रेणीतील घरांचा पुरवठा वाढल्याचे दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news