Pune Airport: पुणे विमानतळावरील ‘उडान यात्री कॅफे’ला प्रवाशांची पसंती; प्रतिदिन सरासरी उलाढाल 20 ते 22 हजारांपर्यंत

16 मे रोजी सर्वाधिक उत्पन्न
Pune Airport
पुणे विमानतळावरील ‘उडान यात्री कॅफे’ला प्रवाशांची पसंती; प्रतिदिन सरासरी उलाढाल 20 ते 22 हजारांपर्यंतPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर नुकत्याच सुरू झालेल्या ‘उडान यात्री कॅफे’ ला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांना उत्तम दर्जाचे पदार्थ आणि आरामदायी वातावरण यामुळे या कॅफेला प्रवाशांकडून चांगली पसंती मिळत असून, दिवसाकाठी सरासरी 20-22 हजारांपर्यंत उलाढाल होत आहे, मात्र आतापर्यंत कॅफेची सर्वाधिक उलाढाल (28 हजार 130 रु.) 16 मे रोजी झाल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली. (Latest Pune News)

Pune Airport
Pune Market Update: पुण्यात फळभाज्यांची आवक घटली; टोमॅटो, आले, फ्लॉवर, भुईमूग शेंग, ढोबळी मिरची महाग

प्रवासाच्या धावपळीत अनेकदा प्रवाशांना जेवण किंवा नाश्ता करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. शिवाय परिसरात मिळणार्‍या खाद्यपदार्थांचे दरही न परवडणारे असल्याने शक्यतो नागरिक तिकडे वळत नाहीत; मात्र ‘उडान’ योजनेअंतर्गत सुरू झालेल्या ‘उडाण यात्री कॅफे’मध्ये चांगल्या दर्जाचे किफायतशीर दरात पदार्थ मिळत असल्याने प्रवाशांकडून विशेष पसंती मिळत असून, प्रवाशांची आता गर्दीही वाढत आहे. मागील शुक्रवारी (दि.16) या कॅफेमध्ये एकूण 1280 युनिट्सची विक्री झाली असून, 28 हजार 130 रुपयांची दिवसभरात उलाढाल झाली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Pune Airport
तंत्रशिक्षण डिप्लोमासाठी आता कॅपच्या तीनऐवजी चार फेर्‍या! मॅनेजमेंट कोट्यातील मनमानीला बसणार चाप

आम्ही प्रवाशांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहोत. ‘उडान यात्री कॅफे’ हा याच प्रयत्नांचा एक भाग आहे. दि. 16 मे रोजीची आकडेवारी पाहता, एका दिवसांत 28 हजारांहून अधिकची उलाढाल होणे, हे प्रवाशांकडून मिळणार्‍या भरभरून प्रतिसादाचे द्योतक आहे. भविष्यातही आम्ही अशाच प्रकारच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देऊ.

- संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ

मी अनेकदा प्रवास करते आणि वेळेवर चांगले, चवदार खाद्यपदार्थ मिळणे हे नेहमीच एक आव्हान असते. पण ‘उडान यात्री कॅफे’मध्ये मला विविध प्रकारचे पदार्थ मिळाले आणि ते खूपच चवदार होते. विशेषतः इथला चहा आणि वडापाव अप्रतिम होता. इथले वातावरणही खूप छान आहे आणि किमतीही परवडणार्‍या आहेत. आता प्रवासात भुकेची चिंता राहणार नाही, कारण हे कॅफे एक उत्तम पर्याय म्हणून उपलब्ध झाले आहे.

- मानसी बेंडे, विमान प्रवासी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news