लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करावे : अजय मोरे

लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करावे : अजय मोरे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शिरूर लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. 13) मतदान होत आहे. सर्व घटकांतील पात्र मतदारांनी आपली जबाबदारी, कर्तव्य समजून या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन उत्स्फूर्तपणे मतदान करावे; आपल्या परिसरातील सर्व मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन शिरूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी केले आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, भोसरी आणि हडपसर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या लोकसभा मतदारसंघांकरिता होणारी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. मतदानाच्या दृष्टीने मतदारसंघांतील सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

प्रशासनाच्या वतीने मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, दिव्यांगांसाठी रॅम्प, सुरक्षा व्यवस्था, उन्हाळ्याची स्थिती लक्षात घेता औषधे, पाचपेक्षा अधिक मतदान केंद्रे असलेल्या मतदान केंद्रांवर बैठक व्यवस्था, उन्हाळा लक्षात घेता मंडपउभारणी आदी सुविधेसोबतच इतर तांत्रिक बाबींची पूर्तताही करण्यात आली आहे, अशी माहिती मोरे यांनी दिली. शिरूर मतदारसंघातील 2 हजार 509 मतदान केंद्रांवर एकूण 11 हजार 586 मतदान अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय स्तरावर मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांना आवश्यक प्रशिक्षणदेखील वेळोवेळी दिले जात आहे.

शिरूर लोकसभा कार्यक्षेत्रात 25 लाख 39 हजार 702 मतदार असून, यामध्ये 13 लाख 36 हजार 820 पुरुष मतदार, 12 लाख 2 हजार 679 महिला मतदार आणि 203 तृतीयपंथी मतदार आहेत. जुन्नर विधानसभा मतदारसंघात 3 लाख 12 हजार 205 मतदार असून, त्यामध्ये 1 लाख 59 हजार 830 पुरुष, 1 लाख 52 हजार 371 महिला, तर 4 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात 3 लाख 2 हजार 101 मतदार असून, त्यामध्ये 1 लाख 54 हजार 535 पुरुष, 1 लाख 47 हजार 559 महिला, तर 7 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख 52 हजार 634 मतदार असून, त्यामध्ये 1 लाख 83 हजार 57 पुरुष, 1 लाख 69 हजार 567 महिला, तर 10 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.

/इ/इशिरूर विधानसभा मतदारसंघात 4 लाख 39 हजार 276 मतदार असून, त्यामध्ये 2 लाख 29 हजार 472 पुरुष, 2 लाख 9 हजार 784 महिला, तर 20 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघात एकूण 5 लाख 51 हजार 582 मतदार असून, त्यामध्ये 3 लाख 2 हजार 75 पुरुष, 2 लाख 49 हजार 416 महिला, तर 91 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात एकूण 5 लाख 81 हजार 904 मतदार असून, त्यामध्ये 3 लाख 7 हजार 851 पुरुष, 2 लाख 73 हजार 982 महिला, तर 71 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.

मतदारसंघांत आत्तापर्यंत एकूण 16 लाख 37 हजार 842 मतदार ओळख चिठ्ठ्यांचे वितरण करण्यात आले आहे. निवडणूक कर्मचारी शहरी, तसेच ग्रामीण भागात जाऊन मतदारांना मतदार ओळख चिठ्ठी देत असून, मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत.
मतदारांना माहितीसाठी मतदार मदत कक्षातील कर्मचार्‍यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधता येईल. जुन्नर विधानसभा मतदारसंघात स्वप्निल दप्तरे 8668987059, सचिन देशपांडे 87967 09848, आंबेगाव विधानसभा मतदारसंघात प्रियांका हुले 9373766483, शुभम गाडेकर 7972210166, खेड आळंदी मतदारसंघात मयूर तनपुरे 8308212990, दत्तात्रय गारगोटे 9075305620, शिरूर विधानसभा मतदारसंघात सदाशिव सावंत 7020875545, जिजा अहिर 9921672119, ज्ञानेश्वर अजबे 9119541263, महेश आढाव 9372135151, आकाश डोईफोडे 9975568181, प्रणव पारगे 8605140123, हडपसर विधानसभा मतदारसंघात सपना रहाटे 7741907356, राजश्री जाधव 8605582265, भोसरी विधानसभा मतदारसंघात वैभव बर्डे 8446516864 यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मतदार साह्यता कक्षाद्वारे मार्गदर्शन

मतदारांच्या मदतीसाठी शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात निवडणूक साह्यता कक्ष स्थापन करण्यात आला असून, या कक्षाशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर किंवा वोटर हेल्पलाइन अ‍ॅपच्या माध्यमातूनही मतदार यादीतील नाव शोधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news