

India Airstrike Operation Sindoor
पुणे: पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानच्या अनेक ठिकाणावर बुधवारी (दि.७) एअर स्ट्राईक केला. भारताने बुधवारी 'ऑपरेशन सिंदूर'च्या द्वारे अनेक दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करून हवाई हल्ले केले.
या हल्ल्यात ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त झाली असल्याची माहिती समोर आले आहे. या कारवाईत ३ जणांचा मृत्यू तर १२ जण जखमी असल्याचे वृत आहे. स्वतः पंतप्रधान मोदी या ऑपेरेशनवर जवळून लक्ष ठेवून होते. या मोहिमेवर पहलगाम पीडितांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. पुण्यातील दिवगंत संतोष जगदाळे यांची पत्नी प्रगती जगदाळे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
काय म्हणली आसावरी जगदाळेने
पहलगाम हल्ल्यामध्ये ज्या 26 जणांचा मृत्यू झाला त्या व्यक्तींपैकी 6 जण महाराष्ट्रातील होते. या 6 जणांमधील 2 जण पुण्यातले होते. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे अशी या दोघांची नाव होती.
जगदाळे कुटुंबीयांनीही या हल्लाचे स्वागत केले असून मिशन संदूर हे अतिशय योग्य नाव दिलं आहे. दहशतवाद्यांनी लेकींचे सिंदूर पुसले. पंतप्रधान मोदींना आमची जाणिव आहे. ऑपरेशन सिंदूर हे मिशनचं नाव ऐकून डोळ्यात पाणी आलं. या मिशनच नाव सिंदूर ठेऊन खूप योग्य केलं आणि आमच्या भावना पण जपल्या. माझी पंतप्रधान मोदींना एकच विनंती आहे की या दहशतवाद्यांची पायामुळे खोदून तो नष्ट करा.
लोकांच्या मनातून दहशतवाद हा शब्दच मिटवून टाका. दहशतवाद्यांनी गोळ्या घालून माझ्या नवऱ्याला मारलं. मी मोदी सरांना आपल्या वडिलांसारखं मानते. आज त्यांनी ऑपरेशन सिंदूर हे नाव देऊन त्या दहशतवाद्यांच्या तळावरती हल्ला केला आहे, तो अतिशय योग्य आहे. मी सरकारचे मनापासून आभार मानते अशी प्रतिक्रिया प्रगती जगदाळे यांनी दिली.
काय म्हणली आसावरी जगदाळेने
आज जे काही झालं त्यासाठी मी सरकारचे खूप खूप आभारी आहे. ऑपरेशन सिंदूर हे मिशनच नाव ऐकून आम्ही फक्त रडत होतो. आज खऱ्या अर्थाने माझ्या वडिलांना सरकारकडून श्रध्दांजली मिळाली असं वाटतं आहे. पंधरा दिवसात मिशन पूर्ण केलं. मी सरकारचे आभार मानते, जे 26 जणांचा मृत्यू झाला होता. त्यांना आज श्रध्दांजली मिळाली आहे, असंही आसावरी म्हणाली.