भीमाशंकर मंदिर रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याचे आदेश

भीमाशंकर मंदिर रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याचे आदेश
Published on
Updated on

मंचर / भीमाशंकर : पुढारी वृत्तसेवा : श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिराकडे जाणारा रस्ता छोटा असून दुकानदारांनी रस्त्यावर अतिक्रमणे केली आहेत. यामुळे भाविकांना अडचण होत आहे. महाशिवरात्री उत्सवापूर्वी देवस्थान, पोलिस, ग्रामपंचायत यांनी रस्त्यावरील अतिक्रमणे दुकानदारांना सांगून दूर करावीत. कोण ऐकत नसेल तर त्याचे अतिक्रमण काढून टाका असा आदेश उपविभागीय अधिकारी गोविंद शिदे यांनी दिला. भीमाशंकर येथे 8 मार्च रोजी महाशिवरात्री यात्रा आहे. त्यामुळे 7 ते 10 मार्चदरम्यान येथे मोठी गर्दी होणार आहे. या यात्रेचे नियोजन करण्यासाठी घोडेगाव येथील तहसील कार्यालयात प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

या वेळी भीमाशंकर देवस्थाचे अध्यक्ष अ‍ॅड.सुरेश कौदरे, तहसीलदार संजय नागटिळक, खेडच्या प्रभारी तहसीलदार नेहा शिंदे, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज, सहायक पोलिस निरीक्षक किरण भालेकर, उपकार्यकारी विश्वस्त मधुकरशास्त्री गवांदे, रत्नाकर कोडिलकर, उदय गवांदे, उपअभियंता सुरेश पटाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ .तुषार पवार आदी उपस्थित होते.
भीमाशंकर मंदिराकडे जाणा-या पायरी मार्गाचे काम सुरू आहे. हे काम 4 मार्चपर्यंत पूर्ण करून पायरी मार्ग दर्शनासाठी खुला करावा
असा आदेश बांधकाम विभागाला देण्यात आला. यात्रेसाठी फिरते स्वच्छतागृह, रुग्णवाहिका, टँकर यांचे नियोजन बैठकीत करण्यात आले. यात्रेपूर्वी हॉटेलांमध्ये विकले जाणारे खाद्यपदार्थ, पेठे यांची तपासणी करावी, असा आदेश अन्न व औषध प्रशासनास देण्यात आला. यात्रा खर्चासाठी शासनाकडून निधी मिळावा अशी मागणी निगडाळे / कोंढवळ व भोरगिरी/ भीमाशंकर ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली.

भीमाशंकर देवस्थान मंदिरातील सुशोभीकरण, लायटिंग, जनरेटर, फुलांची सजावट, मांडव, शूटिंग, मार्गदर्शक व दिशादर्शक फलक यांची व्यवस्था करणार आहे. दि.7 रोजी मध्यरात्री बारा वाजता शासकीय पूजा होऊन यात्रेला सुरुवात होईल.

– सुरेश कौदरे, अध्यक्ष, भीमाशंकर देवस्थान.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news