

पुणे: विरुद्ध दिशेने निघालेल्या डंपरचालकाने एका दुचाकीचालकाला उडविले. डोक्यावरून डंपरचे चाक गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू. आलम खान (वय. ३१) असे तरुणाचे नाव आहे. आज सकाळी पावणे अकरा वाजताची शास्त्रीनगर चौक ते गुंजन चौक परिसरातील घटना. डंपरचालक फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. (Latest Pune News)