'दहा लाख लाभार्थ्यांना एका क्लिकद्वारे देणार दीड हजार कोटी'

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्या होणार वितरण
Amit Shah
'दहा लाख लाभार्थ्यांना एका क्लिकद्वारे देणार दीड हजार कोटी'File Photo
Published on
Updated on

पुणे: प्रधानमंत्री आवास योजनेंंतर्गत राज्यातील दहा लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता सुमारे 1500 कोटी रुपये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते एका क्लिकवर दिला जाणार आहे. यात पुण्यातील 19 हजार लाभार्थी असून ही रक्कम सुमारे 30 कोटी रुपये आहे.

लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरणाचा कार्यक्रम उद्या शनिवारी (दि. 22 फेब्रुवारी) पुण्यातील बालेवाडीमधील शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार असून, त्याचे थेट प्रक्षेपण ग्रामपंचायत, तालुका व जिल्हा पातळीवर करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.

राज्यातील सर्व ग्रामपंचायत, तालुका व जिल्हास्तरावर स्क्रीनची व्यवस्था केली आहे. सर्व आमदार, खासदार व मंत्र्यांना वैयक्तिक निमंत्रण देण्यात आले आहे. बालेवाडीतील कार्यक्रमाला सहा हजार लाभार्थ्यांची उपस्थिती राहणार आहे. या ग्रामोत्सव कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहून घरकुल लाभार्थ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

या वेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्र्यासह खासदार व आमदार उपस्थित राहणार आहेत. राज्यात 20 लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे. त्यातील दहा लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याची रक्कम दिली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news