Swapnil Kusale |ऑलिम्पिकवीर नेमबाज स्वप्निल कुसाळेने घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन

ऑलिम्पिकवीर नेमबाज स्वप्निल कुसाळे दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला
Paris Olympics Swapnil Kusale
पॅरिस ऑलिम्पिकच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन इव्हेंटमध्ये स्वप्निल कुसाळेने कांस्य पदक जिंकले. file photo
Published on
Updated on

पुणे - ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्निल कुसाळे भारतात परतला आहे. आज ढोल ताशाच्या गजरात स्वप्निल कुसाळेचे पुणे विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले. स्वप्निल कुसाळेने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची आरती करून मनोभावे दर्शन घेतले. यावेळी ट्रस्टकडून त्याला शुभेच्छा देत श्रींची मूर्ती भेट देऊन स्वागत सत्कार करण्यात आले.

महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्निल कुसाळेने ५० मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्य पदक पटकावलं आहे. या स्पर्धेत स्वप्निलने एकूण ४५१.४ गुण प्राप्त केले. पॅरिस येथून स्वप्निल हा आज भारतात परत आला असून पुणे विमानतळावर त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. यानंतर स्वप्निलने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन घेत आरती केली. यावेळी ट्रस्टकडून स्वप्निलचे स्वागत करण्यात आले.

गणपती बाप्पा मोरया.. बाप्पाच्या मुळेच सर्व काही आहे, म्हणून पहिल्यांदा बाप्पाला भेटायला आलो आहे. जे मागितलं आहे ते बाप्पाने आजपर्यंत दिलं आहे.

स्वप्निल कुसाळे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news